शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश , कोपरा गावातील ये-जा करण्यासाठी बंद केलेला रस्ता पूर्ववत सुरू....
शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश , कोपरा गावातील ये-जा करण्यासाठी बंद केलेला रस्ता पूर्ववत सुरू....

पनवेल / वार्ताहर  : काही दिवसापूर्वी खारघर शहरातील कोपरा गावामध्ये हुंदई शोरूम सेक्टर- १० समोरील रस्ता पी.डब्ल्यु.डी च्या अधिकाऱ्यांच्या मार्फत बंद करण्यात आला होता. कोपरा गावातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याने याची शिवसेनेचे शाखा प्रमुख सचिन ठाकुर यांनी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख यांच्या कडे निवेदनाद्वारे नागरिकांची व्यथा मांडली असता, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी तत्काळ खारघर विभागातील पी.डब्ल्यु.डी च्या संबंधित अधिकार्‍यांना याबद्दल ची चौकशी करून बंद केलेला रस्ता पूर्वरत चालू करण्याकरिता निवेदनाद्वारे मागणी केली.


सदर गोष्टीची दखल घेत पी.डब्ल्यु.डी च्या तुर्भे येथील विभागाने त्वरित रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. सदर निवेदन देताना शिवसेना पनवेल महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, उपशहर प्रमुख प्रकाश गायकवाड व शाखा प्रमुख सचिन ठाकुर आदी उपस्थित होते.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image