मच्छी चोरणारा इसम गजाआड ....
मच्छी चोरणारा इसम गजाआड ....

पनवेल, दि.१ (वार्ताहर)  : -   शहरातील मच्छी मार्केट येथे उघड्यावर ठेवलेल्या लॉक नसलेल्या बंद फ्रिज मधील मच्छी चोरणार्‍या एका सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे.
मंजुळा भोईर (50) यांचा मासे विक्रीचा व्यवसाय असून त्यांनी शहरातील उरण नाका मच्छि मार्केट येथे उघड्यावर ठेवलेल्या लॉक नसलेल्या बंद फ्रिजमध्ये हलवा मासा, रावस मासा, पाकट मासा, ससा मासा असा एकूण 22 हजार रुपये किंमतीचा माल ठेवला होता. सदर माल लबाडीने आरोपी दिनेश जाधव याने चोरुन नेला होता. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करताच महानगरपालिकेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सदर आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या अटकेमुळे परिसरातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Comments