पारगावच्या सरपंच अहिल्या नाईक यांच्या हस्ते हेअर नेशन (मेन्स पार्लर)चे उद्घाटन...
पारगावच्या सरपंच अहिल्या नाईक यांच्या हस्ते हेअर नेशन (मेन्स पार्लर)चे उद्घाटन...
पनवेल, दि.९ (वार्ताहर) ः तालुक्यातील दापोली, पारगाव, ओवळा विभागातील सर्वांसाठी प्रथमच वातानुकूलीत असे केश कर्तनालय व मसाज सेंटर सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
कु.रुतूज प्रकाश पाटील यांनी हा नवीन व्यवसाय सुरू केला असून, या उद्घाटनप्रसंगी दापोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रणिला प्रकाश डाऊर, मुकूंद गरडे, कर्नाळा स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष तसेच कर्नाळा स्पोर्टस् स्मार्ट समितीचे सदस्य डॉ.प्रकाश पाटील व ग्रामपंचायत पारगावच्या सदस्या निशा पाटील, मा.उपसरपंच रत्नदीप पाटील, मा.उपसरपंच मनोज दळवी, बाबुराव म्हात्रे, ज्ञानेश्‍वर म्हात्रे, ह.भ.प. अरुणबुवा गजानन म्हात्रे, एस.डी.तारेकर, दापोली गावचे माजी उपसरपंच गजानन पाटील, अशोक डाऊर, राजेश पाटील, कैलास तारेकर, अनंत तारेकर, सुनील पाटील आदींसह अनेक ग्रामस्थ व इतर हितचिंतक उपस्थित होते. या अत्याधुनिक सोयीच्या वातानुकूलीत सलूनमुळे परिसरातील नागरिकांना आता पनवेल किंवा आसपासच्या परिसरात जावे लागणार नाहीये.
Comments