अभिनेत्री विजया बाबर यांनी घेतले आदिमाया स्वरूपातील सद्गुरू श्री स्वामी समर्थांचे दर्शन...
अभिनेत्री विजया बाबर यांनी घेतले आदिमाया स्वरूपातील सद्गुरू श्री स्वामी समर्थांचे दर्शन...
पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः  नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये पनवेलमध्ये गावदेवी पाडा येथे असलेला श्री स्वामी समर्थ मठ (मंदिर) येथे गेल्या अनेक वर्षापासून स्वामींचे आदिमाया स्वरुपात दर्शन स्वामी सेवकांना देण्यात येते. त्याचे प्रत्यक्ष दर्शन कलर्स मराठी वाहिनी वर जय जय स्वामी समर्थ या मालिकेत चंदा ही भूमिका सादर करणारी अभिनेत्री विजया बाबर यांनी घेतले. यावेळी त्या भारावून गेल्या होत्या.
पनवेल मधील श्री स्वामी समर्थ मठ हा अत्यंत जागृत असून या ठिकाणी पनवेलसह रायगड जिल्ह्यातून तसेच ठाणे, नवी मुंबई, मुंबईमधून व उपनगरातून मोठ्या प्रमाणात स्वामी सेवक येथे येत असतात. दरवर्षी येथे वेगवेगळे सण,उत्सव साजरे करण्यात येतात. नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये येथील मठाधिपती सुधाकर (भाऊ) घरत व त्यांचे कुटुंबिय स्वामींना वेगवेगळ्या प्रकारच्या आदीमायेच्या स्वरुपात साकारतात व त्यांचे दर्शन घेण्याकरिता दुरवरुन भक्त येत असतात. 
या ठिकाणी स्वामी सेवक महिला मंडळ यांच्या मार्फत दिवसभर स्वामी सेवा सुरू असते. त्यामध्ये भजन, किर्तन, महाप्रसाद आदी या नऊ दिवसात सुरू असते. कोरोनाचा कालखंड कमी झाल्यामुळे आता मंदिरे खुली करण्यात आली आहेत. अनेकांना अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचे दर्शन अक्कल कोट येथे जावून घेता येत नाही. परंतु तेच भक्त या ठिकाणी येवून स्वामींची सेवा करतात व बोललेले नवस फेडतात. त्यातच स्वामी महाराजांच्या तसबीरला नवरात्रीत नऊ दिवस निरनिरळ्या रंगाच्या वस्त्रांमध्ये आदिमायांचे स्वरुप दिले जात असल्याने व विविध अलंकाराने सजविले जात असल्याने त्यांचे सौंदर्य अजूनच खुलते. 

Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image