जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेत शेकडो तरुणांचा जाहीर पक्ष प्रवेश...
जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेत शेकडो तरुणांचा जाहीर पक्ष प्रवेश...

पनवेल वैभव / प्रतिनिधी : -  शनिवार दिनांक २३ ऑक्टोबर २०२१ रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या कार्यप्रणाली वर प्रेरित होऊन शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली व युवासेना उपजिल्हा अधिकारी रायगड अवचित राऊत यांच्या पुढाकाराने पनवेल, कामोठे, विचुंबे तसेच पाली-देवद येथील योगेश चव्हाण व ऋषभ मोहिते यांच्या सह त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांनी युवासेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.

यावेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत साहेब यांनी सर्व युवकांच्या हाती शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी शिवसेना पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, युवासेना जिल्हा समन्वयक नितीन पाटील, विधानसभा अधिकारी पराग मोहिते, शहर अधिकारी विनोद पाटील ,उपविधानसभा अधिकारी अरविंद कडव, सुशांत सावंत, अनिकेत पाटील, महेश भिसे, निखिल दिघे, सनी टेमघरे, विभाग अधिकारी प्रेम ठाकूर, शाखा प्रमुख अनिल तळवणेकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments