इनरव्हील क्लब व लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने मोफत डोळ्यांची तपासणी व चष्मे वाटप शिबीर संपन्न

पनवेल / वार्ताहर : -  २ ऑक्टोबर २०२१ रोजी इनरव्हील क्लब ऑफ पनवेल आणि लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रोज भाजी मार्केट - पनवेल येथील महिला भाजी विक्रेत्यांसाठी मोफत डोळ्यांची तपासणी आणि चष्मे वाटप शिबीर आयोजित करण्यात आले होते. 
सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी नगरसेविका दर्शना भोईर यांनी खूप मदत केली. मांडव घालणे, पंख्यांची आदी बाबींची सोय त्यांनी उत्तम रित्या करुन दिली . 

लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉक्टरांनी डोळ्यांची तपासणीची जबाबदारी अतिशय उत्तमरित्या पार पाडली . त्याचप्रमाणे इनरव्हीलच्या क्लब मेंबर्सनी भाजी विक्रेत्या महिलांना तपासणीला येण्यासाठी प्रोत्साहित केले . त्याचप्रमाणे क्लब मेंबर ज्योत्स्ना जोशी हिने उपस्थितांच्या चविष्ट भोजनाची सोय केली . मेंबर श्वेता भातखंडे हिने पौष्टिक लाडू उपस्थितांना खाऊ घातले . डिस्ट्रीक्ट सेक्रेटरी डॉ. शोभना पालेकर यांनी सकाळीच शिबीराला उपस्थिती लावली आणि सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रे.सुलभा निंबाळकर , सेक्रे . श्वेत वारिंगे , जयंती हळदीपूरकर , पी पी पूर्णिमा जोशी , पी पी सुनिता जोशी , एडि . गौरी अत्रे , वैशाली भावे , श्वेता भातखंडे , डॉ. वंदना ठाक्कर या सगळ्यांच्या सहयोगाने हे शिबीर अत्यंत उत्साहात यशस्वीरित्या पार पडले.
Comments