अपघाताचा बहाणा करुन व्यावसायिका जवळची ५ लाखाची रक्कम लुटली, अज्ञात टोळीचा खारघर पोलिसांकडून शोध सुरु...
अपघाताचा बहाणा करुन व्यावसायिका जवळची ५ लाखाची रक्कम लुटली, अज्ञात टोळीचा खारघर पोलिसांकडून शोध सुरु...  

पनवेल, दि.29 (वार्ताहर) ः मोटारसायकला धडक दिल्याच्या बहाणा करुन एका टोळीने मुंबईतील एका व्यावसायीकाची कार भररस्त्यात अडवून त्यांच्या कारमध्ये असलेली 5 लाख रुपयांची रोख रक्कम लुटून पलायन केल्याची घटना उघडकिस आली आहे. खारघर पोलिसांनी या टोळी विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  
या प्रकरणातील तक्रार गुरुचरणलाल मारवा हे चेंबुर येथे राहण्यास असून त्यांचा  कळंबोलीतील स्टील मार्केटमध्ये ऑटोमोबाईल स्पेअर पार्टसचा व्यवसाय आहे. मारवा एपीएमसी मार्केटमधील मित्राकडून पाच लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन आपल्या कारने कळंबोली येथे जात होते. यावेळी त्यांनी सदरची रक्कम आपल्या कार मधील डॅश बोर्ड मध्ये ठेवली होती. यावेळी मारवा खारघर जवळ फणसवाडी येथे आले असताना, त्यांच्या पाठीमागून मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी त्यांची कार अडवून पाठीमागे त्यांच्या कारने एका मोटारसायकलला धडक दिल्याचे व ते पाठीमागे उभे असल्याचे सांगितले. त्यामुळे मारवा आपली बंद करुन पाठीमागे त्यांच्या कारमुळे कुणाला दुखापत झाली आहे, हे पहाण्यासाठी चालत गेले.  यावेळी काही अंतरावर त्यांना एका मोटारसायकलकासोबत एक महिला स्वत:चा पाय पकडून बसल्याचे निदर्शनास आले. यावेळी सदर महिलेने देखील मारवा यांना त्यांच्या कारची धडक लागल्यामुळे जखमी झाल्याचे सांगून त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. याचवेळी मारवा यांच्या कारजवळ उभ्या असलेल्या दोघा लुटारुंनी त्यांच्या कारची काच फोडून कारच्या डॅश बोर्ड मध्ये ठेवलेली 5 लाखांची रोख रक्कम लुटून पलायन केले. महिलेसोबत बोलणी करुन मारवा काही वेळानंतर आपल्या कारजवळ आल्यानंतर त्यांच्या कारची काच फुटल्याचे व त्यातील रोख रक्कम चोरुन नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी खारघर पोलीस ठाण्यात धाव देऊन तक्रार दाखल केली.
Comments