खांदा कॉलनीच्या मराठा समाजाचा खांदा लागल्याशिवाय आरक्षणाचा लढा पूर्ण होऊ शकत नाही - संभाजीराजे छत्रपती...
खांदा कॉलनीच्या मराठा समाजाचा खांदा लागल्याशिवाय आरक्षणाचा लढा पूर्ण होऊ शकत नाही - संभाजीराजे छत्रपती
पनवेल, दि.27 (वार्ताहर) ः  मराठा क्रांती मोर्चा - रायगड तर्फे आयोजित राजेंची जनसंवाद यात्रा खांदा कॉलनी येथे पोहोचली असता मराठा समाज महिला मंडळ यांनी राजेंचे औक्षण केले. सकल मराठा समाज खांदा कॉलनी च्या वतीने शाल व पुष्पहार घालून समाज बांधवांनी राजेंचे स्वागत केले.
या जनसंवाद दौर्‍यास पाच तास उशीर होऊन देखील मराठा समाज बांधवाची गर्दी कमी झाली नाही. खांदा कॉलनी च्या मराठा समाज बांधवानी डोक्यावर घातलेले भगवे फेटे व शिस्तबद्ध नियोजन याचे राजेंनी विशेष कौतुक केले. सकल मराठा समाज खांदा कॉलनीच्या आरक्षण लढ्याच्या चळवळीतील सहभाग बाबत खांदा कॉलनी च्या समाज बांधवांचा खांदा लागल्याशिवाय हा आरक्षणाचा लढा अपूर्ण असल्याचे सांगितले. या दौर्‍यावेळी सकल मराठा समाज खांदाकॉलनी व मराठा उद्योजक सारथी च्या लोगो चे अनावरण राजेंच्या हस्ते झाले. या प्रसंगी रायगड जिल्हा समनव्ययक व खांदा कॉलनी तील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.


फोटो ः संभाजी राजे यांचे स्वागत.
Comments