१ लाख ७४ हजारांची ऑनलाईन फसवणूक.....
१ लाख ७४ हजारांची ऑनलाईन केली फसवणूक.....

पनवेल दि. १० (संजय कदम)- 1 लाख 74 हजारांची ऑनलाईन फसवणूक एका वृद्ध इसमाची झाल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे.
          गौतम घटक (वय-60, रा.-तक्का) असे या इसमाचे नाव असून त्यांना एका अज्ञात इसमाने फोन करून तो एक्सिस बॅंक क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगून त्यांच्या क्रेडिट कार्डवर रिवार्ड पॉईंट्स जमा झाली असून ते तुम्ही रिडीम करून घ्या असे खोटे सांगून त्यांच्या क्रेडिट कार्ड क्रमांकाची सर्व माहिती घेऊन त्यानंतर त्याने बॅंकेच्या खोट्या साईटवर जाण्यास सांगून त्यांच्या सर्व माहितीच्या आधारे त्यांच्या क्रेडिटकार्ड वरून त्यांच्या संमतीशिवाय कोणत्यातरी अनोळखी खात्यावर एकूण 1,74,397 रू. ट्रान्सफर करून त्यांची ऑनलाईन फसवणूक केल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments