२० ट्रेलर मिळून ४ कोटीचा केला एका इसमाने अपहार....
२० ट्रेलर मिळून ४ कोटीचा अपहार....

पनवेल, दि. ११ (वार्ताहर) ः ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी विश्‍वासाने भाड्याने दिलेले 20 ट्रेलर ज्याची आजमितीस बाजारी किंमत जवळपास 4 कोटी रुपये इतकी आहे. ते ट्रेलर भाड्याने न लावता सदर कंपनीला फसवून त्या ट्रेलरचा अपहार केल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
अमित अग्रवाल यांच्या ताब्यात असलेले 20 ट्रेलर हे भाड्याने रेबारी टेम्पो सर्व्हीस कंपनी, पुरणसिंग रेबारी, अशोक रेबारी तसेच त्याच्या सोबत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सहभागी असलेल्या इसमांनी हे 20 ट्रेलर ताब्यात घेवून ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी विश्‍वासाने भाड्याने लावतो असे सांगून त्यानंतर सदर ट्रेलरचे भाडे न देता त्याचप्रमाणे सुप्रिम ट्रान्सपोर्ट ऑर्गनायझेशन प्रा.लि. या कंपनीला परत न देता स्वतःच्या फायद्याकरिता ताब्यात ठेवून त्याचा अपहार केल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments