ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, मयुर तांबडे, विकास पाटील, संजय कदम कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित....
ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, मयुर तांबडे, विकास पाटील, संजय कदम कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित....
तळोजा / प्रतिनिधी
ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील पत्रकार विकास पाटील पत्रकार, पत्रकार संजय चंद्रकांत कदम, पत्रकार सागर राजे पत्रकार मयुर तांबडे यांना कोरोना योद्धा पुरस्काराने नगरसेविका प्रज्योती म्हात्रे, ह भ प बाळाराम पाटील यांच्या हस्ते  सन्मानित करण्यात आले आहे. 
किरण पाटील हे गेली पाच वर्षा पासून आपल्या मुलींचा वाढदिवस  आदिवासी मुलांच्यात साजरा करत आले आहेत, त्यांनी आज कानपोली ग्रामपंचयती मधील अतिदुर्गम भागातील हेदुटने आदिवासी शाळेत मुलगी कार्तिकी  हीचा बारावा वाढदिवस साजरा केला,  आदिवासी मुलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी  व या शाळेतील मुलांना शाळेची आवड निर्माण व्हावी या एकाच उद्देशाने किरण पाटील आपल्या कुटुबातील व्यक्तीचा वाढदिवस आदिवासी पाड्यातील शाळेत साजरा करत आले आहेत,  दिनांक 29 ऑक्टोंबर रोजी .साजरा करण्यात आलेल्या वाढदिवसानिमित्त  कोरोना महामरित पत्रकार मित्राने आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेला सहकार्य केले असा जेष्ठ पत्रकार माधव पाटील, पत्रकर मयुर तांबडे, पत्राकर विकास पाटील यांना कोरोना योद्धा  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
आदिवासी मुलांची दिवाळी साजरी  करताना टी शर्टचे वाटप करण्यात आले सर्व मुलाला फराळाचेहीं वाटप करण्यात आले,  कार्तिकी हिच्या 
वाढदिवसानिमित्त दरवर्षी आदिवासी मुलाना शाळा उपयोगी वस्तूचे वाटप किरण पाटील यांच्या वतीने करण्यात येते,
किरण पाटील समाज बांधिलकी म्हणून आपल्या परिवाराचा वाढदिवस अन्य लोकांसारखा धुमधडक्यात , दारूच्या पार्ट्या  न झाडता आदिवासी मुलांच्यात  करत आहेत हे त्यांचे मोठेपण आहे,  कोरोना महामारीत आम्ही आमचे काम केले , लोकांच्यात जनजागृती करत कोरोनावर  आपण विजय मिळवू शकतो. त्यासाठी आपणही शासनाने घालून दिलेले नियमाचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे
असे माधव पाटील यांनी आापल्या गौरव प्रसंगी सांगितले,
यावेळी डाऀ. राहूल भोईर, बिल्डर संदेश पाटील, मंगेशसर रामदास टेंभे, नामदेव गिरा, मलावेसर, उज्वला पाटील, प्रतीक्षा पाटील आदीसह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते,
Comments