जनकल्याण नागरी सहकारी बँकेचे शाखाधिकारी यांचा करण्यात आला विशेष सत्कार...
जनकल्याण नागरी सहकारी बँकेचे शाखाधिकारी यांचा करण्यात आला विशेष सत्कार...
पनवेल, दि.27 (वार्ताहर) ः पनवेल शहरातील जनकल्याण नागरी सहकारी बँकेचे शाखाधिकारी भरत सांगोलकर यांची ठाणे शाखा येथे बदली झाल्याने प्रभागातील नगरसेविका, व्यापारी बंधू व खातेदारांनी त्यांचा आज विशेष सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
पनवेल शहरातील जनकल्याण नागरी सहकारी बँकेचे शाखाधिकारी भरत सांगोलकर यांची बदली ठाणे येथे झाल्याने आज बँकेत जावून स्थानिक नगरसेविका रुचिता लोंढे, शाखाधिकारी महेश कांबळे, पत्रकार संजय कदम, उद्योजक राजेंद्र बोहरा, इंदरसिंग चुडावत, घेवर चौधरी, महेंद्र राजपुरोहित आदींनी त्यांना शाल, पुष्पगुच्छ व पेढे देवून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आजपर्यंत त्यांनी सर्वांना केलेल्या सहकार्याबद्दल व्यापार्‍यांच्या वतीने उद्योजक राजू बोहरा यांनी त्यांचे विशेष आभार मानले.

Comments