कर्ज मिळवून देतो असे सांगून केली 98 हजारांची फसवणूक....
कर्ज मिळवून देतो असे सांगून केली 98 हजारांची फसवणूक....

पनवेल, दि. १३ (वार्ताहर) ः उद्योग कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवून कर्ज न देता 98 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नवीन पनवेल येथे उघडकीस आला आहे. अज्ञात आरोपी विरोधात खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवीन पनवेल, सेक्टर 19 येथील प्रेरणा वसंत रणखांबे यांचा हॉटेल व्यवसायिकांना बॅग, कंटेनर पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. यावेळी सौरभ भोनकर यांनी त्यांना फायनान्स कंपनीतून कर्ज मिळवून देतो असे सांगितले. आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतून 60 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो असे सांगून त्यांच्याकडून 10 हजार रुपये घेतले. त्यानंतर सौरव याने कर्ज मंजूर करण्याचे काम हा त्याचा मित्र प्रेमशील साळवी करून देईल असे सांगितले. त्यानंतर प्रेमशील साळवी याने कर्ज मंजूर करण्याकरता 88 हजार रुपये रणखांबे यांच्याकडून घेतले. मात्र कर्ज मंजूर केले नाही. कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने रणखांबे यांच्याकडून दोघांनी 98 हजार रुपये घेऊन त्यांना कर्ज दिले नाही. व त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी सौरभ भोनकर व प्रेमशील साळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
Comments