राजे शिवाजीनगर रहिवासी मंडळाच्या वतीने आयोजित नेत्रचिकित्सा शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद ..

पनवेल, दि. १८ (वार्ताहर) ः राजे शिवाजीनगर रहिवासी मंडळ, कळंबोली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नेत्रचिकित्सा शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
            गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कळंबोली येथील राजे शिवाजीनगर रहिवासी मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही परिसरातील नागरिकांसाठी मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 52 जणांना माफक दरात चश्मे आणि 70 जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच एकूण 122 रूग्णांवर मोफत उपचार करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विशाल गावंड, प्रमुख सल्लागार सूर्यकांत म्हसकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अहोरात्र मेहनत घेऊन हे शिबिर यशस्वी केले.          
Comments