तोतया पोलिसाने घरातील दागिने केले लंपास....
तोतया पोलिसाने घरातील दागिने केले लंपास...

पनवेल, दि.15 (संजय कदम) ः तोतया पोलिसाने एका घरात जावून 80 हजाराची चोरी केली आहे .  तुमचे घर तपासावे लागेल असे सांगून घरातील सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना तालुक्यातील जावळे गावाच्या हद्दीत घडली आहे.
चंदा म्हात्रे  (43) यांचे जावळे गावाजवळील उलवे सेक्टर 25 येथे घर आहे. त्या ठिकाणी एक अनोळखी इसम हा आला व त्याने आपण पोलीस असल्याची बतावणी करून त्यांना व त्यांच्या पतीला 80 हजाराची चोरी झालेली आहे तरी तुमचे घर तपासावे लागेल असे सांगून तुमच्याकडील पैसे व सोने दाखवा अशी धमकी दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने जवळपास 52 हजार 500 रुपये किंमतीचे दाखविले असता सदर इसम दागिने घेवून पळून गेल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात केली आहे.
Comments