मा.उपमहापौर विक्रांत पाटील आयोजित "गणपती बाप्पा रंगवा" स्पर्धेला बच्चे कंपनीचा भरघोस प्रतिसाद...
 
पनवेल / प्रतिनिधी : -  आपल्या प्रभागातील नागरिकांच्या कला-गुणांना वाव मिळावा यासाठी नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमी प्रयत्नशील असतात.याचाच एक भाग म्हणून कोविडमुळे घरात बसून राहण्याची जबरदस्तीच्या सुट्टीमुळे कंटाळलेल्या प्रभाग क्रमांक १८ च्या  लहान मुलांच्या साठी  "गणपती बाप्पा रंगवा स्पर्धा" आयोजित करण्यात आली होती,या स्पर्धेचे उदघाटन पनवेल विधानसभा आमदार प्रशांतजी ठाकूर यांच्या हस्ते झाले.चिंतामणी हॉल येथे ५-९ आणि १०ते १५ पंधरा वर्ष अशा दोन वयोगटासाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती.बच्चे कंपनीने स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.

कोविडमुळे बरेच दिवस कोणतेही उपक्रम किंवा स्पर्धा होत नसल्या कारणाने लहान मुले हिरमुसली होती.या स्पर्धेच्या आयोजनामुळे लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आंनद दिसून येत होता आणि त्यात आपल्या बाप्पाला स्वतःच्या हाताने रंगावयचं या संकल्पनेने मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता.दोन्ही गट मिळून २५० मुलं-मुलींनी या स्पर्धेत सहभाग घेतला.लहान मुलांच्या बरोबर पालकांचा उत्साह ही या स्पर्धेसाठी दांडगा होता. 
"माझा बाप्पा किती छान, माझा बाप्पा माझा अभिमान"  या सेल्फी पॉइंट वर कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या बरोबर बच्चे कंपनीने सेल्फी काढली.तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सहभाग पत्रही देण्यात आले. "गणपती बाप्पा रंगवा" स्पर्धेसाठी पनवेलच्या महापौर सन्मा.सौ कविता ताई चोतमल,कोकण म्हाडा मा.सभापती बाळासाहेब पाटील,पनवेल शहर भाजपा अध्यक्ष जयंत सागडे, नगरसेवक- ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष मनोज भुजबळ, सभापती प्रभाग समिती नगरसेविका हेमलता म्हात्रे, नगरसेविका रुचिता लोंढे, नगरसेविका संजना कदम,भाजपा युवा नेते समीर कदम, नगरसेवक नितीन पाटील,भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत कदम. युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर,भाजपा माजी तालुका अध्यक्ष पनवेल तानाजी खंडागळे, भाजप नेते प्रदीप देशमुख,भाजपा नेते देविदास  खेडकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image