शिक्षकदिनी गुरुवर्यांचा सन्मान; मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांचा स्तुत्य उपक्रम...

पनवेल / प्रतिनिधी : - भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.शिक्षक दिनाचे औचित्य साधून नगरसेवक  विक्रांत पाटील यांनी प्रभागातील गुरुवर्यांच्या घरी जाऊन त्यांचा आदर सत्कार केला व त्यांचे आशीर्वाद घेतले.
नगरसेवक विक्रांत पाटील नेहमीच अशा अनोख्या उपक्रमांच्या माध्यमांतून प्रभागातील जनतेपर्यंत पोहोचण्यास तत्पर असतात.
“गेली वर्षोनुवर्षे शिक्षक अनेक विद्यार्थी घडवीत आले आहेत. त्यांचे हे कार्य अत्यंत मोलाचे व देशाच्या उन्नतीसाठी महत्वाचे असे राष्ट्रकार्य आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्याचे अहोभाग्य मिळणे हे माझे भाग्यच आहे. ”असे या उपक्रमाबद्दल बोलताना श्री. विक्रांत पाटील मत व्यक्त केले.
नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केलेल्या या सन्मानाने सर्व शिक्षक भारावून गेले व त्यांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आले. विक्रांत पाटील यांनी शिक्षकदिनाच्या या उपक्रमाच्या माध्यमातून तमाम शिक्षकांच्या सेवेला सलाम केला.
Comments