साई निधी- टोपाज बारवर तालुका पोलिसांची कारवाई...

पनवेल दि.११ (वार्ताहर)- पनवेल जवळील कोन परिसरात असलेल्या साई निधी- टोपाज लेडिज बारवर पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई करीत महिला वेटर, मॅनेजर व ग्राहकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
        सदर बार हा विहित वेळेत बंद करून ग्राहकांसाठी गुप्त पद्धतीने पुन्हा चालू करून शासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून बारमधील महिला वेटर या पुरूष ग्राहकांसोबत अश्लील व विभत्स मिळून आले म्हणून एकूण ३२ जणांविरुद्ध हि कारवाई करण्यात आली आहे. 
सदर कारवाई अ.मा.वा.प्रति.कक्ष गुन्हे शाखेचे वपोनि पराग सोनावणे, वपोनि रविंद्र दौंडकर, सपोनि प्रशांत शिर्के, पोलिस उपनिरीक्षक उमेश भुटाळ व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
Comments