नवीन पनवेल परिसरातील शेकडो तरूणांनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश...
नवीन पनवेल परिसरातील शेकडो तरूणांनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश....

पनवेल दि.०७ (संजय कदम): शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणाली वर प्रेरित होऊन, शिवसेना जिल्हाप्रमुख-रायगड पनवेल शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली व उपमहानगर प्रमुख यतीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाने नवीन पनवेल येथील शेकडो तरूणांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
           शिवसेना जिल्हाप्रमुख-रायगड पनवेल शिरीष घरत, उपमहानगर प्रमुख यतीन देशमुख, दिपक घरत, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, कामोठे शहरप्रमुख राकेश गोवारी, विभागप्रमुख संतोष गोळे, शिवसैनिक सिद्देश गुरव, आदी पदाधिकाऱ्यांनी शिवबंधन बांधून सुजान जोशी, सोहम नाईक, अनुराज पाटील, साहिल भंडारे, दिवेश पाटील, ऋषी जमादार, विशाल ठाकूर, साहिल जगताप, पराग केकीतकर, जयेश सुर्वे, मंगेश जोशी, हिमांशु पाटील, सौहार्द धुरत, रुशभ मोहिते या सर्व युवकांचे शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केल्याबद्दल स्वागत केले.
           

Comments