क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन तर्फे मंगळागौर संपन्न ....
पनवेल / प्रतिनिधी : महिलांच्या विकासासाठी व न्याय हक्कासाठी अग्रेसर असणारी संस्था म्हणून क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन परिचित आहे. नुकतीच क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनतर्फे मंगळागौर कार्यक्रम पार पडला, तसेच यावेळी घेण्यात आलेल्या खेळात एकूण ६ ग्रुपने सहभाग घेतला होता यामध्ये रणरागिणी ग्रुप, श्रावणी ग्रुप ,फुलोरा ग्रुप, गावदेवी ग्रुप, सखी ग्रुप,मैत्री ग्रुप यांचा समावेश होता. 
यावेळी प्रथम क्रमांक सखी ग्रुप (पनवेल )यांनी पटकावून मनाची पैठणीचा मान मिळविला तर द्वितीय क्रमांक मैत्री ग्रुप( कामोठे ) तसेच तृतीय क्रमांक श्रावणी  ग्रुप (पनवेल) यांनी भरगोस प्रमाणात बक्षिसांची लूट करीत पटकविला. यावेळी परीक्षक म्हणून  डॉक्टर वनिता गडदे मॅडम कार्यक्रमाला लाभल्या, तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल , माजी नगरसेविका नीता माळी  ,युवा नेत्या अदिती सोनार चवाते ,लेखिका चित्रा देशमुख,रिमा रावल , संचिता राणे ,अमिता चौहान, रुपा सिन्हा, मंदा जंगले, संगीता राऊत आदी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण मोहकर यांनी केले. तर क्रांतीज्योत फाउंडेशनतर्फे अध्यक्षा रूपालिताई शिंदे उपाध्यक्षा नंदीनी गुप्ता , खजिनादार किरण अडागळे ,मौसमी तटकरे , रत्नमाला पाबरेकर ,रोशना घुमटकर ,मिताली शिंदे ,लावण्या, प्रिया व सभासद सदस्यांनी आलेल्या पाहुण्यांचे व सर्व गृप चे आभार मानले.
Comments