रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने पनवेल मध्ये मधुमेह तपासणी...
पनवेल / प्रतिनिधी :- आज भारत मधुमेहाच्या रुग्णांच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे
देशातील मधुमेही रुग्णांना मधुमेहाची लवकर ओळख अत्यंत गरजेचे आहे त्याप्रमाणे त्यांना आपल्या आरोग्य शैलीत योग्य तो बदल घडविणे महत्वाचे आहे
आणि जीवनाची चांगली गुणवत्ता राखण्यासाठी. त्याचे लक्ष केंद्रित करणे
रोटरीने मधुमेहाच्या अभ्यासासाठी रिसर्च सोसायटीसह एमओयू करून रक्तातील साखर तपासण्यासाठी चाचण्या आयोजित करण्यासाठी रोटरी (RSSDI) त्याचा भागीदार आहे

 २९ सप्टेंबर हा "जागतिक हृदय दिन" असून हे "रोटरी सेवा दिवस" म्हणून देशभर साजरा केला गेला या दिवशी भारतात १० लाख मधुमेहाच्या मोफत चाचण्या विविध रोटरी क्लबच्या माध्यमातून करण्याचा संकल्प रोटरीचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष रो. शेखर मेहता यांनी केला आहे. तसेच या प्रकल्पाला श्री श्री रविशंकर यांचे आशीर्वाद आहेत.
          त्याचा एक भाग म्हणून रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल च्या वतीने पनवेल मध्ये डॉ. गुणे हॉस्पिटल, डॉ. पटेल हॉस्पिटल, डॉ. दांडेकर हॉस्पिटल, डॉ. आवटे यांचे महर्षि क्लिनिक, डॉ. मोरे लॅब या पाच केंद्रात मोफत मधुमेह तपासणी शिबिरे घेण्यात आली. सदर शिबीरात ६०० च्या वर लाभार्थीनी लाभ घेतला. सदर शिबिरास DRFC डॉ. गिरीश गुणे अध्यक्ष डॉ. अभय गुरसाळे, सचिव संतोष घोडींदे, प्रोजेक्ट संचालक रो . सायली सातवळेकर, रो. आरती खेर,माजी अध्यक्षा प्रिया पाटील, सहाय्यक प्रांतपाल डॉ. रमेश पटेल,माजी अध्यक्ष डॉ.आमोद दिवेकर, डॉ.लक्ष्मण आवटे,रो. डॉ.सुरेश मोरे, डॉ. संजीवनी गुणे, डॉ. कांचन दिवेकर, डॉ. जयाबेन गुरसाळे, डॉ. कुणाला माखीजा, लक्ष्मण पाटील, शैलेश पोटे, अनिल ठकेकर, सुरेश सैतवडेकर,डॉ. मिलिंद घरत,नीलम विभूते, शोभा रानडे, श्वेता वारंगे, डॉ.रोहिणी घरत, ज्योती गडगे, दिपक गडगे, मैत्रेयी आंग्रे, योगेंद्र कुरघोडे,  कविता रंगपारिया, ब्लू क्रॉसचे दत्ता गर्जे , बी जी पाटील,  नंदिनी वेलणकर, यांचे सह अनेक रोटरी सदस्य, ऍन्स व सर्व हॉस्पिटल व्यवस्थापन व कर्मचारी मदतीसाठी हजर होते.
Comments