युवानेते केदार भगत यांच्या रुग्णवाहिकेचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण व आरती संग्रहाचे प्रकाशन

पनवेल/प्रतिनिधी: भाजपचे युवा नेते केदार भगत यांच्या रूग्णवाहिकेचे लोकार्पण आणि गणपती आरती संग्रहाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना रामशेठ ठाकूर यांनी, केदार हा वर्षभर असे सामाजिक उपक्रम राबवित असतो. तरूणांमध्ये त्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची हातोटी आहे. कुठलाही फायदा न बघता काम करण्याच्या वृत्तीमुळे निस्वार्थी कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख झाली आहे. केदार भगत यांनी त्यांचे हे कार्य असेच सुरू ठेवावे असे बोलताना ठाकूर यांनी सांगितले.

यावेळी सचिन भगत ,राजेंद्र भगत,सुमित दसवंते ,प्रशांत शेटे , केवळ महाडिक( राजे प्रतिष्ठान रायगड ),ओमकार महाडिक ,भाजप शिव वाहतूक संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष दत्ता केंद्रे, नितेश भगत , गौरव सावंत, हर्षद गडगे, योगेश साळवी, शेषनाथ गायकर,अजित सिंग ,रवी परचे, मितेश भोपी ,संकेत दसवंते ,अनिल पोशिलकर ,संतोष वर्तले, भावेश शिंदे, संतोष धागे,आनंद गुरव, इस्माईल,
चेतन डुकरे, चिन्मय भगत ,यज्ञेश पाटील, निहाल पाटील, ब्रिटिश बहिरा,अविनाश जालान,  संजय कदम आदी उपस्थित होते.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image