मोटार सायकलच्या धडकेत सायकलस्वार जखमी...
मोटार सायकलच्या धडकेत सायकलस्वार जखमी...

पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः एका मोटार सायकलस्वाराची धडक सायकलला बसल्याने सायकलस्वार जखमी झाल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे.
आसिफ अबरार खान याचे वडील सायकलवरुन शहरातील सुखम हॉस्पिटलच्या समोर पंचरत्न चौक ते शिवशंभो नाका रस्त्यावरुन जात असताना त्यांच्या सायकलीस मोटार सायकलवरुन आलेल्या एका इसमाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते खाली पडून त्यांच्या दोन्ही हाताला तसेच डोक्याला गंभीर दुखापती झाल्या आहेत. या घटनेनंतर सदर मोटार सायकलस्वार हा पसार झाल्याने त्याच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Comments