रोटरी इंटरनॅशनलच्या वतीने संपूर्ण जगभरात मधुमेह फ्री कॅम्पचे आयोजन...
पनवेल : वार्ताहर : - रोटरी इंटरनॅशनलच्या वतीने संपूर्ण जगभरात मधुमेह फ्री कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे, संपूर्ण जगभरात 10 लाख मधुमेह रुग्णांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट रोटरी इंटरनॅशनलच्या वतीने करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रोटरी क्लब ऑफ उलवे नोड यांच्यावतीने से.२, ३, ५, १७, १९, २३ (एकायन हॉस्पिटल, डॉ. तानाजी जाधव यांचे क्लिनिक, होलीस्टिक क्लिनिक) इ. ठिकाणी या मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी रविशेठ पाटील, रोटरी उलवेचे प्रेसिडेंट रो. शिरीष कडू, सेक्रेटरी रो. निलेश सोनवणे, शामराव निंबाळकर उपस्थित होते.
Comments