ग्रुप ग्रामपंचायत पारगावने राबविलेल्या मोफत लसीकरण मोहिम कौतुकास्पद...
पनवेल, दि. २० (वार्ताहर) ः तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पारगावने राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार राबविलेल्या मोफत लसीकरण मोहिमेचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून आज त्यांनी 150 जणांचे मोफत लसीकरण केले आहे.
कोव्हीशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस वय वर्षे 18 व 45 वरील व्यक्तींना आज देण्यात आला. सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करीत व आधारकार्डद्वारेच हे लसीकरण करण्यात आले. यासाठी सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांनी शासनाकडे व आरोग्य विभागाकडे विशेष प्रयत्न करून 150 डोस उपलब्ध करून घेतले. यासाठी त्यांना वैद्यकीय अधिकारी गव्हाण-कोपरच्या डॉ.अस्मिता पाटील तसेच उपसरपंच अंजली कांबळे, मा.उपसरपंच मनोज दळवी, मा.उपसरपंच सुशिल तारेकर, सदस्य विश्‍वनाथ पाटील, सदस्या निशा पाटील, बाळूबाई म्हात्रे, सुनंदा नाईक, शिल्पा नाईक, कल्पना तारेकर, सोनाली भोईर तसेच डॉ.भारती, मा.उपसरपंच रत्नदीप पाटील, कर्मचारी प्रमोद म्हात्रे, सोनाली देशमुख, चंद्रभागा तारेकर-देवळे आदींनी विशेष मेहनत, सहभाग घेवून हा उपक्रम यशस्वी केला. या उपक्रमाचे पनवेल तालुक्यातून कौतुक करण्यात येत आहे.

Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन खारघर मधील शेकडो महिला व पुरुषांचा सेनेत जाहीर पक्ष प्रवेश ....
Image