पनवेल कार्यक्षेत्रातील गृह विलगीकरणातील रुग्णांच्या दोन्ही हातांवर मारले जाणार शिक्के



पनवेल, दि.४ :  कोविडची रुग्णसंख्या थोपविण्यासाठी पनवेल कार्यक्षेत्रातील नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. होम आयसोलेशन मध्ये राहणारे रुग्ण अनेकदा बाहेर फिरताना दिसतात परिणामी कोरानाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसते म्हणून रुग्णाच्या दोन्ही हातांवर शिक्के मारण्यात येणार  असल्याचे त्यांनी सांगितले.
 
पनवेल कार्यक्षेत्रातील पाच किंवा पाच पेक्षा जास्त पॉझीटिव्ह रूग्ण असणाऱ्या सोसायटी सील करण्यात येणार असून या इमारतीमधील सर्व रहिवास्यांची चाचणी करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

गणोत्सव कोरोनाचे नियम पाळून नागरिकांनी साजरा करावा. नागरिकांनी  गर्दी न करता मास्कचा, सॅनिटायझर, सोशल डिस्टसिंगचे पालन करावे. मास्क न वापरणार्‍यांवर कडक कारवाई करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.
Comments