शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी इसमा विरुद्ध कारवाई

पनवेल दि.११ (वार्ताहर)- सरकारी कर्तव्य बजावत असताना त्यांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी रिक्षा चालका विरुद्ध पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
       वाहतूक शाखेत कार्यरत असणारे राजेंद्र नामदेव श्रीगणेश (वय-५६) हे सरकारी कर्तव्य बजावत असताना रिक्षा चालक दिपक मदलीयार (वय-३०) याला रिक्षा व्यवस्थित चालव सांगितले. त्याचा राग येऊन तो त्याच्या अंगावर धावून गेला व शिवीगाळ करून बघून घेईन अशी धमकी दिल्याने त्याच्या विरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
Comments