कळंबोली राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्षासह पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश...
पनवेल वैभव / प्रतिनिधी :  - आज मंगळवार दि .२८ रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन, मावळ लोकसभा खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड पनवेल शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली व पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे तसेच पनवेल विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर यांच्या विशेष प्रयत्नांने, कळंबोली शहरातील पनवेल शहर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्याक्ष व धनगर समाजाचे नेते तसेच उद्योजक आबासो रामचंद्र लकडे यांच्यासह शेकडो समर्थकांनी भगवा झेंडा फडकावत शिवसेना पक्षात शिवबंधन बांधून जाहीर पक्षप्रवेश केला.

यावेळी लकडे यांनी शिवसेनेतील पक्षप्रवेशा बाबत पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ,खासदार श्रीरंग अप्पा बारणे, रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत, महानगर प्रमुख रामदास शेवाळे,तसेच पनवेल विधानसभा समन्वयक प्रदिप ठाकूर यांचे आभार प्रकट केले, व पक्ष जी काही जबाबदारी देईल ती पार पडून शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रयन्त करणार असल्याचे सांगितले.

या प्रसंगी शिवसेना पनवेल उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, आत्माराम गावंड, प्रकाश चांदीवडे, शहरप्रमुख डि.एन. मिश्रा, प्रदीप केणी, शहर समन्वयक गिरिष धुमाळ, शहर संघटक अक्षय साळुंखे, उपशहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर, नारायण फडतरे विभाग प्रमुख पद्माकर पाटील, महेश गुरव, आकाश शेलार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments