मोबाईल चोरांना प्रवाशांनी दिले पोलिसांच्या ताब्यात...
मोबाईल चोरांना प्रवाशांनी दिले पोलिसांच्या ताब्यात...

पनवेल, दि.5 (वार्ताहर) ः पनवेल बसस्थानकामध्ये दोन प्रवासी पानवेलवरून खोपीलीकडे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना खिश्यातील मोबाईल चोरणार्‍या चोरट्याना प्रवाश्यानी पकडून पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हा प्रकार पनवेल बसस्थानकात घडला. याबाबत पोलिसांनी तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे.
यातील तक्रार दुखीश्याम नारायण दास राहणार खोपोली येथे राहत असून प्लम्बर चे काम करीत आहे. यावेळी पनवेल मधून खोपीलीकडे जाण्यासाठी  दुखीश्याम व त्याचा मित्र बसची वाट पाहात होते. यावेळी खोपोलीची बस बस स्थानकात येताच बसमध्ये चढण्यासाठी गर्दी झाली होती. यावेळी यावेळी दुखीश्याम व त्याचा मित्र हे दोघेजण बसमध्ये चढत असतानाच खिश्यामध्ये असलेल्या व्हिवो कंपनीचा मोबाईल गर्दीचा फायदा घेत कोणीतरी काढत असल्याचे लक्षात आले. आणि मोबाईल खिश्यातुन काढून चोरट्याच्या साथीदाराकडे दिला व बसमधून उतरत होते. यावेळी दुखीश्याम याने आरडा ओरड करीत मोबाईल चोर असे केले. त्यावेळी तेथेच असलेल्या प्रवाश्यानी त्या दोन चोरट्याची धरपकड केली. व मारहाण केली. व पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर या मोबाईल चोरटयांनी आणखी काही मोबाईल चोरले आहेत का याचा तपास पोलीस करीत आहेत.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image