राज्यपालांच्या हस्ते प्रितम जनार्दन म्हात्रे यांना पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान
पनवेल / प्रतिनिधी :-  राष्ट्रीय वन हुतात्मा दिनाचे औचित्य साधून राज भवन मुंबई येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सध्याच्या आधुनिकीकरणाच्या युगात प्रत्येक जण आधुनिक पद्धत अवलंबण्याचा मार्ग धरतात परंतु अशा परिस्थितीत काहीवेळा पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे याकडे आपले अप्रत्यक्षपणे दुर्लक्ष होते. आधुनिकीकरणा बरोबरच निसर्गाचं पर्यावरण राखण्यासाठी सुद्धा बरेच महाराष्ट्रातील तरुण युवक पुढे येतात अशा युवकांच्या कार्याची दखल घेऊन ११ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहीम भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभहस्ते पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आणि  जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रितम जनार्दन म्हात्रे यांना "पर्यावरण मित्र"* पुरस्कार देण्यात आला.
     याप्रसंगी लेखक चंद्रकांत शहासने लिखित "पर्यावरण विचार" ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी युवकांनी पुढे येण्याची गरज आहे. शहरीकरणामध्ये आधुनिकीकरणा बरोबरच जास्तीत जास्त नैसर्गिक रित्या पर्यावरण संवर्धना कडे पाहण्याची गरज आहे. आजकाल कुठल्याही क्षणी वातावरणामध्ये बदल होऊन पाऊस ,पूर परिस्थिती , दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. यासाठीच महाराष्ट्रातील  युवकांनी , विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. 
        महाराष्ट्रामध्ये पर्यावरणा सोबतच विविध क्षेत्रात ठळक कामगिरी करणाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले.
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image
१५ वर्षीय मुलाला कायदेशीर रखवालीतून नेेले पळवून...
Image
तुरमाळे येथील नैना विरोधातील आमरण उपोषणास भेट देत शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते यांनी दिला पाठींबा...
Image