शिवसेना खांदा कॉलनी शहर शाखेच्या विभाग प्रमुखपदी सुशांत जाधव व भोजराज होटकर यांची नियुक्ती...


पनवेल वैभव वृत्तसेवा : - 
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार व शिवसेना नेते व संपर्क नेते कोकण विभाग तथा राज्याचे उद्योग व खनिकर्म मंत्री मा. सुभाषजी देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाने तसेच शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना खांदा कॉलनी शहर शाखेच्या विभाग प्रमुखपदी सुशांत जाधव व भोजराज होटकर यांची नियुक्ती करण्यात आली तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी शिवसेना पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, उपमहानगर संघटक रामदास गोंधळी, खांदा कॉलनी शहर प्रमुख सदानंद शिर्के, उपशहरप्रमुख दत्तात्रेय महामुलकर, संपत सुवर्णा, शहर संघटक संतोष जाधव, उपशहर संघटक प्रकाश वानखडे, संजीव गमरे, कार्यालय प्रमुख संदीप तोरणे, युवासेना उपविधानसभा अधिकारी सुशांत सावंत, उपविधानसभा अधिकारी सनी टेमघरे, शाखाप्रमुख सुनील औटी, मंगेश पवार, पुंडलिक म्हात्रे, अतुल घुग, जेष्ठ शिवसैनिक शिवाजी शेठ दांगट, लेकुरवाळे सर, उपशाखा प्रमुख बाळू भोर, युवासेना विभाग अधिकारी आभेष ओंबळे शाखा अधिकारी सौरव महामुलकर, ऋषीकेश घुले, उपशाखा अधिकारी साहील तावरे, माजी कार्यालय प्रमुख तानाजी घारे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
Comments
Popular posts
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image
स्वीकृत नगरसेवक पदी प्रथमेश सोमण यांच्या नावावर शिक्कामोर्तब...
Image