केवड्याचे रोप भेट देवून ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा ...

पनवेल / वार्ताहर :  -  केवड्याचे रोप भेट देवून ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला,   यावेळी वादळवारा  दैनिकाचे संपादक विजय कडू, पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी, एकता आवाज फाउंडेशनचे अध्यक्ष विक्रम येलवे, पुण्यनगरीचे साहिल रेळेकर,आर्या प्रहरचे संपादक सुधीर पाटील आदी मान्यवर उपस्थित उपस्थित होते.
        
वाढदिवसाचे औचित्य साधून आर्या प्रहरचे संपादक सुधीर पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना केवड्याचे रोप भेट देण्यात आले. यावेळी सुधीर पाटील यांनी केवडा या वनस्पती बद्दल थोडक्यात मान्यवरांना माहिती दिली. वाढदिवसाचे औचित्य साधून वनौषधी रोपे भेट देण्याची ही नवी संकल्पना सुधीर पाटील गेली दहा वर्ष जनसामान्यांमध्ये पोहोचवत आहेत. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे नागरिक कौतुक करीत आहेत.
Comments