पनवेल परिसरातील ज्वेलर्स दुकानांची सुरक्षितता धोक्यात
पनवेल  दि. ०३ (वार्ताहर)- : ज्वेलर्सच्या दुकानात सोने खरेदीच्या बहाण्याने प्रवेश करून काही भामटे दुकानांची पाहणी करतात आणि ज्या ज्वेलर्स दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, सुरक्षारक्षक नाहीत, अशाच ठिकाणी दरोडे टाकले जात आहेत. त्यामुळे ज्वेलर्स दुकानाच्या मालकांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि सुरक्षारक्षाकाची नेमणूक करावी अशी मागणी करण्यात येत आहे. एक महिन्यांपूर्वी पनवेल शहरातील झवेरी बाजारात दरोडा पडला मात्र तरीही येथील दुकानदार जागृत नसल्याचे दिसून येत आहे.
          सण उत्सव व लग्न सराईत पनवेलमधील ज्वलेर्स दुकानांमध्ये गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेवून ग्राहकाच्या वेशात आलेले भामटे चोर सोन घेवून पसार होतात. काही वेळा भर दिवसा दुकान लुटण्याची घटना पनवेलमध्ये घडल्या आहेत. एक महिन्यांपूर्वी भरदिवसा एका व्यापाऱ्यावर हल्ला चढवीत सोने लुटले असल्याची घटना पनवेल येथील झवेरी बाजारात घडली आहे. त्याचबरोबर येथील दुकानदार लाखोचा नाही तर कोटयावधी रूपयांचे सोने दुकानात ठेवतात मात्र आपली सुरक्षा कशा प्रकारे करावीत याकडे मात्र दुलर्क्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. सीसी कॅमेरे कुठे आहेत, तर कुठे नाहीत. त्याचबरोबर काही दुकानदारांचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले आहेत. तर काही कॅमेऱ्याचे रेकॉर्डच बंद आहेत. यावेळी प्रत्येक दुकानात क्लोज सर्किंट कॅमेरे असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मोठं-मोठ्या दुकानाच्या बाहेर बंदूकधारी सुरक्षा रक्षक असणे गरजेचे आहे. मात्र असे सुरक्षा रक्षक याठिकाणी असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळेच चोरटे आपला मोर्चा ज्वेलर्सच्या दुकानाकडे नेत संधीचा फायदा घेत दरोडा, घरफोडी, चोरी करीत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत ज्वेलर्स दुकानदारांनी सुद्धा सतर्क राहणे गरजेचे आहे.
Comments