तळोजा गाव कमानीपासून ते बागे गृहसंकुल सेक्टर 40 चा रस्ता दुरुस्त करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची आयुक्तांकडे मागणी
पनवेल, दि.29 (वार्ताहर) ः तळोजा गाव कमानीपासून ते बागे गृहसंकुल सेक्टर 40 हा रस्ता तातडीने दुरुस्त करून द्यावी अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे.
यावेळी सतिश पाटील अध्यक्ष, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, अजिनाथ सावंत उपाध्यक्ष, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, शहबाज पटेल कार्याध्यक्ष, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस, बळीराम नेटके अध्यक्ष, खारघर शहर, प्रशांत रणावरे युवा नेते, रियाज हमदुले, शाहजहान चौगले, मुश्ताक अंतुले, फैजान मोमीन आदी पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, तळोजा हे गाव पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील एक मोठे गाव आहे. या गावामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे. तळोजा गावामध्ये तळोजा कमानीपासून ते नव्याने वसाहत निर्माण झालेल्या बागे गृहसंकुल सेक्टर 40 पासूनचा रस्ता अत्यंत खराब व दुरावस्थेत आहे. येथून ये-जा करताना येेथील रहिवाशांना नेहमीच त्रास होत आहे. त्याचप्रमाणे पावसाळ्यात खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकी तसेच चार चाकी वाहनांचा अपघात व वाहन सुद्धा नादुरुस्त होत आहेत. तरी या संदर्भात लक्ष घालून पनवेल महानगरपालिकेने चांगल्या दर्जाचा रस्ता उभारुन द्यावा, अशी मागणी कार्याध्यक्ष शहवाज फारुक पटेल यांनी केली आहे.
फोटो ः रस्त्यावर पडलेले खड्डे
Comments