कळंबोलीत खिशातून मोबाईल खेचून चोरी ; पळून जाण्यासाठी पल्सर दुचाकीचा वापर..पनवेल / वार्ताहर  :-  कळंबोली वसाहतीतील मर्निंग वॉकला पायी चालत असलेल्याएका व्यक्तीच्या खिशात असलेला मोबाईल दोन अज्ञात इसमांनी पल्सर या मोटार सायकलवर येत मोबाईल खिशातून काढून चोरून नेल्याची घटना कळंबोली परिसरात घडली आहे. याबाबत कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कळंबोली वसाहतीमधील सुशांत पाटील (वय-34 वर्षे) राहणार जय माता दि बिल्डींग, सेक्टर 08, कळंबोली याठिकाणी आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत. पाटील हे घरगुती जेवणाचे डब्बे पोहोचविण्याचे व्यवसाय करीत आहेत. तसेच कोरोनाच्या पार्शवभूमीवर व्यवसाय बंद पडल्याने साड्या कोठेही नोकरीसाठी नाही. यावेळी रोज सकाळी कळंबोली येथील डीमार्ट भागात मॉर्निंग वॉकला पायी चालत जात असत. नेहमीप्रमाणे पाटील हे सकाळी बाहेर पडले होते. यावेळी एयर फोन लावून गाणे ऐकत फोन शर्टच्या वरील खिश्यामध्ये ठेवला होता. यावेळी पायी चालत कळंबोली पेट्रोलपंपाचे पुढे असलेल्या सेक्टर 8 चे मैदानालगतच्या रस्त्यावरून जात असताना त्यांच्या पाठीमागुन डाव्याबाजुने एका काळ्या रंगाची पल्सर कंपनीची मोटार सायकल आली. व यातील बाईकवर पाठीमागे बसलेल्या अज्ञाताने पाटील यांच्या शर्टच्या खिशात ठेवलेला 7,000/- रु.किंमतीचा मोटोरोला कपंनीचा मोबाईल जबरदस्तीने खेचुन ते अज्ञात चोर पसार झाले. याबाबत पाटील यांनी कळंबोली पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली आहे. याबाबत कळंबोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Comments