ठाण्यात फेरीवाल्याने हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर पनवेलमहापालिकेच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन


पनवेल,दि. ३१ : ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे यांच्यावर अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत असताना अमरजीत यादव या फेरीवाल्याने तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला, या हल्ल्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावतीने आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

दिनांक 30 ऑगस्टला ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या अतिक्रमण विरोधी पथक घेऊन अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत असताना तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीचा फेरीवाला अमरजीत यादव याने श्रीमती पिंपळे व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला केला यामध्ये दोघांनाही गंभीर दुखापत झाली. या गंभीर कृत्याचा निषेध करण्यासाठी तसेच या घटनेतील गुन्हेगारांवर तात्काळ खटला चालवून, गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आयुक्त तसेच महाराष्ट्र राज्य मुख्याधिकारी संघटना मुंबईचे अध्यक्ष गणेश देशमुख यांना निवेदन दिले. 

गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा कर्तव्य बजावत असताना अधिकाऱ्यांवर हल्ले करतात,तेव्हा अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते. त्यामुळे अशा प्रकारच्या हल्ल्या विरोधात संघटित निषेध करण्यासाठी आज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन केले.

याप्रसंगी उपायुक्त विठ्ठल डाके, सचिन पवार सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव आणि मनपा कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी अनिल जाधव, शैलेश गायकवाड, सुनिल मानकामे आणि मोठ्या संख्येने महिला कर्मचारी ही उपस्थित होत्या.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image