पनवेल / वार्ताहर :- गेल्या काही दिवसापूर्वी महाड, खेड आणि चिपळूण याठिकाणी अतिवृष्टीचा तडाखा बसून महापुराने आपले विक्राळ रूप दाखवून दिले. यामध्ये अनेक जणांची घरे पाण्यात पूर्णपणे बुडून गेली होती. तसेच घरामधील सर्व सामान पाण्यात वाहून गेले होते. या सर्व नागरिकांच्या मदतीसाठी पनवेलमधील विविध संस्था या त्याठिकाणी पोहोचून जवळपास २५ हजार लोकांना अन्न शिजवून खावू घालत आहेत. त्यांच्या या कार्यात एक खारीचा वाटा म्हणून व राज्यात संकटे येण्याची आणि त्याला समर्थपणे सामोरं जाण्याची कसब राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख मा. उद्धवजी बाळसाहेब ठाकरे यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिली आहे. त्यांच्या या कार्याला प्रेरित होऊन शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी शिवसेना पनवेल मधील शिवसेना पदाधिकार्यांना पूरग्रस्त भागांना मदत करण्याचे आव्हान केले होते. . त्या आवाहनाला जिल्ह्यातील शिवसैनिकांनी स्वीकारले असून सर्वत्र मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
नवीन पनवेल, पनवेल, कलंबोली, खांदाकॉलनी, खारघर शहर, पनवेल ग्रामीण तसेच युवसेना व महिला आघाडी च्या वतीने व रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत साहेब यांच्या वतीने चिपळूण कोकण पूरग्रस्थानां मदतीचा एक हात म्हणून कपडे, ब्लंकेट, चादरी, अन्नधान्याच्या कीटा, फळ, भांडी, जीवनआवश्यक अश्या गोष्टींची पुर्णपणे मदत करण्यात आली.
या मदत कार्याला शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत, शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा संघटक दीपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, उपमहानगरप्रमुख दिपक घरत, कैलास पाटील, लीलाधार भोईर युवासेना जिल्हा समन्वयक नितीन पाटील, विधानसभा अधिकारी पराग मोहिते, सुशांत सावंत शहरप्रमुख सदानंद शिर्के, रूपेश ठोंबरे, शंकर ठाकुर, डी.एन. मिश्रा, गिरीश धुमाळ, सुकेश भोपी, प्रशांत जाधव, अच्युत मनोरे, यतीन देशमुख, महिला आघाडीच्या कल्पना पाटील, सौ. रेवती सकपाळ, सुजाता कदम, टीया आरोडा-धुमाळ, मंदा जंगले, नंदा चेडे, नंदू घरत , सूर्यकांत म्हसकर, नारायण फडतरे, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे विशेष सहकार्य लाभले.