पनवेल, दि.१० (वार्ताहर) ः पश्चिम महाराष्ट्रात, कोकणात विशेषतः महाड, खेड, व चिपळूण या भागात अतिवृष्टीमुळे महापुराचे अस्मानी संकट आले.
आशा बिकट संकटात आपदग्रस्तांच्या हाकेला साद द्या, अश्या आशयाच्या शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना संघटना माणुसकीच्या उदात्त भावनेने लोकांच्या मदतीला धावून गेली. नवीन पनवेल शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडी कडून आपदग्रस्तांच्या सहायते साठी आवाहन करण्यात आले. लोकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपले कर्तव्य पार पाडले, कर्तव्य तत्पर मान्यवरांनी मुक्तहस्ते मदत सामग्री दिली. अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू, तात्काळ खाण्यायोग्य खाऊ, कपडे, चादरी, भांडी व औषधे इत्यादी वस्तू घेऊन चिपळून येथील खेरडी, सती, मजरेकाशी गाव, पेढे (ज्या ठिकाणी दरड कोसळली) आणि आसपासच्या वाड्या पाड्याच्या वस्तीत आपदाग्रस्त गरजूंना वाटण्यात आले.
यावेळी खासदार विनायक राऊत, उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभले. चिपळूण येथे या सर्व गावांमध्ये मदत पोचवण्यासाठी गौरव पाटेकर यांची मोलाची मदत झाली.
सदर मदतकार्य नवीन पनवेल शिवसेनेचे पदाधिकारी महिला शहर संघटिका अपूर्वा प्रभू , विभाग संघटक संजय गोवेकर, उपविभाग प्रमुख राजेश वायंगणकर, युवासेना सदस्य कैलास कांदळकर, शाखा प्रमुख विश्वनाथ गुरव, शिवसैनिक जयंत पाखरे, अभय प्रभू, शाखा प्रमुख संदेश कर्नाटकी व सौ. योगिता कर्नाटकी हे उपस्थित होते.