२० लाखांचा स्क्रॅपचा माल पाठवतो सांगून दोघांनी केली व्यापाऱ्याची फसवणूक....
२० लाखांचा स्क्रॅपचा माल पाठवत असल्याचे सांगून दोघांनी केली व्यापाऱ्याची फसवणूक....

पनवेल दि.०९ (संजय कदम)- दोन आरोपींनी संगनमत करून सिद्धीविनायक ट्रेडिंग कंपनी व शिवकुमार अग्रवाल यांच्या कंपनीस जवळपास 20 लाखांचा स्क्रॅपचा माल पाठवत असल्याचे सांगून त्यांच्याकडून पैसे काढून घेऊन फसवणूक केल्याची घटना तळोजा औद्योगिक वसाहतीत घडली आहे.
           शिवकुमार अग्रवाल (वय-58) यांचे आरोपी प्रदिप व राकेश हे स्क्रॅपच्या व्यवसायाशी संबंधित आहेत. यातील आरोपींनी तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये देवकी नंदन कंपनी याठिकाणी संगनमत करून सिद्धीविनायक ट्रेडिंग कंपनी व श्री स्टिल इंडस्ट्री यांच्या कंपनीस प्रत्येकी 25 टन लोखंडी राऊंड बार हा स्क्रॅपचा माल पाठवत असल्याचे सांगून प्रत्येकाकडून 9, 97, 620 रूपये व 9, 95, 731 रूपये असा एकूण 19, 93, 351 रूपयांचा धनादेश स्विकारून या दोघांनाही माल न पाठविल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तळोजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Comments