शिवसेना शाखा हरिग्रामच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा...

पनवेल / वार्ताहर :-  शिवसेना पनवेल ग्रामीण भागातील हरिग्राम गावातील स्व. हनुमान म्हात्रे यांच्या स्मरणार्थ शिवसेना शाखा हरिग्राम यांच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. 

याप्रसंगी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बक्षिसे व पुरस्कार देवून त्यांना सन्मानित करण्यात आले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, विधानसभा संघटक दीपक निकम, तालुका संघटक भरत पाटील, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, नवीन पनवेल शहर प्रमुख रूपेश ठोंबरे, शाखाप्रमुख हरिग्राम दिपक घरत, ग्रामपंचायत सदस्य राज्यश्री घरत, सुभाष जले, शिवाजी घरत, दशरथ घरत, प्रमोद घरत, गणेश घरत, भोळेश्वर घरत, रोहित घरत, रोनक घरत, महिला आघाडीच्या विधानसभा संघटिका रेवती सकपाळ, तालुका संघटिका अनीता डांगरकर, मीना सदरे तसेच  शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, हरिग्राम गावाचे ग्रामस्थ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments