शासकीय कर्तव्यात आणला अडथळा; ट्रक चालकावर कारवाई.....
शासकीय कर्तव्यात अडथळा आणला म्हणून ट्रक चालकावर कारवाई....

पनवेल, दि.७ (संजय कदम) ः शासकीय कर्तव्यात अडथळा आणला म्हणून एका ट्रक चालकाविरुद्ध तळोजा पोलिसांनी कारवाई केली आहे.
अब्दुल कलीम अब्दुल हकीम हा ट्रक चालक त्याच्या ताब्यातील ट्रक क्र.एमएच-04-केएफ-8536 हा घेवून पेंधर फाटा, नावडे फाटा ते आयजीपीएल सिमेंट तळोजा एमआयडीसी येथून ताब्यातील वाहन हे कानात ब्ल्यु टुथ लावून भरधाव वेगाने चालवित असताना त्याला तळोजा पोलीस ठाण्याचे पो.हवा. सचिन यादव व पो.शि.दयानंद सोनावणे यांनी थांबविले असता त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करून दुखापत केली म्हणून त्याच्या विरुद्ध भादवी कलम 353, 332, 504, मोटार वाहन कायदा कलम 184/177, 250 (अ) / 177 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
Comments