क्रेन मशिनमधून ५ बॅटऱ्यांची चोरी....
क्रेन मशिनमधून ५ बॅटऱ्यांची चोरी....

पनवेल दि. ३१ (संजय कदम)- तळोजा औद्योगिक वसाहतीतील गॅरेजमध्ये उभ्या करून ठेवलेल्या दोन हेअरिंग क्रेन मशीन मधील 4 बॅटऱ्या व हायड्रा क्रेनमधील 1 बॅटरी अशा एकूण 5 बॅटऱ्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे.
          अवतारसिंग केअरसिंग भट्टी (वय-61) यांनी मास्टर लिफ्टर्स गॅरेजमध्ये या क्रेन ठेवल्या असता अज्ञात चोरट्यांनी त्यातील 21 हजारांच्या 5 बॅटऱ्या चोरल्याने याबाबतची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments