शिवसेना नविन पनवेल पाणी प्रश्नावर आक्रमक ; मार्ग नाही निघाला तर सिडकोला टाळं ठोकणार...


नवीन पनवेल :-  बरेच दिवसापासून नवीन पनवेल विभागात, येथील नागरिक पिण्याच्या स्वछ पाण्याच्या उपलब्ध ते च्या मूलभूत हक्क अधिकारापासून वंचित आहेत त्याचा उद्रेक होऊन महिलांनी नवीन पनवेल शिवसेना, युवा सेना व महिला संघटनेच्या नेतृत्वात सिडको ऑफिस नवीन पनवेल येथे पाणी विभागाचे अभियंता सागर जगदाळे यांच्या ऑफिस वर मोर्चा नेऊन आपल्या मागण्याचे निवेदन दिले. सदर विभागात गढूळ पाणी येते , पाणी पुरवठा नियमित नसून, अतिशय तुटवडा भासत असल्याने कित्येक ठिकाणी मोटरपम्प लावून पाण्याचा उपसा होतो व इतरांना पाणी उपलब्ध होत नाही. 
सिडकोचे अधिकारी जगदाळे यांनी या विषयावर उच्चपदास्थाशी विचार विनिमय करून विभागातील पाण्याचे प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न करू असे आश्वासन दिले 
या प्रसंगी यतीन देशमुख उपमहानगरप्रमुख अपूर्वा प्रभू महिला शहर संघटिका, सुगंधा शिंदे,  संजय गोवेकर विभाग संघटक,  ज्ञानेश्वर भंडारी उपशहर संघटक, राजेश वायंगणकर उपविभागप्रमुख, युवासेना पदाधिकारी सिद्धेश गुरव, कैलास कांदळकर, जेष्ठ शिवसैनिक जयंत पाखरे तसेच सर्व शिवसैनिक, महिला आघाडी व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.
Comments