मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांची तत्परता ; स्वामी नित्यानंद मार्गावरील ड्रेनेज झाकण त्वरित बदलले....
पनवेल :- गार्डन हॉटेल ते पनवेल महानगरपालिका कार्यालय या स्वामी नित्यानंद मार्गावरील सिजलर कोबे हॉटेल समोरील ड्रेनेजचे झाकण कमकुवत झाले होते आणि कोणत्याही क्षणी तुटण्याची शक्यता होती.
एखादे जड वाहन त्यावरून जाऊन झाकण तुटून दुर्घटना होण्याची शक्यता होती.या विषयाचे गांभिर्य लक्ष्यात घेऊन महापालिका अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क साधून सदर ड्रेनेजचे झाकण त्वरित बदलण्यास सांगितले.
कॉन्ट्रॅक्टर ने त्वरित नवीन लोखंडी झाकण आणून त्याठिकाणी लावले.
*माझा प्रभाग,माझी जवाबदारी* या अनुषंगाने काम करणारे कार्यक्षम  नगरसेवक विक्रांत पाटील नेहमी प्रभागातील समस्या सोडवण्यास तत्पर असतात त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
Comments