पनवेल, दि. २४ : महापालिकेची विविध विकास कामे पनवेल कार्यक्षेत्रात सध्या सुरू असून कामांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवरती कारवाई करण्याचे आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले आहेत.
नुकतीच आयुक्त गणेश देशमुख यांनी प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेणारी बैठक घेतली. या बैठकिस अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर तसेच इतर अभियंता उपस्थित होते.
या दरम्यान काही कंत्राटदार कामात हलगर्जीपणा तसेच दिरंगाई करत असल्याचे आढळल्याने अशा कंत्राटदारांवरती कारवाई करण्यांचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
पनवेल कार्यक्षेत्राचा विकास गतीने होण्याच्या दृष्टीने आयुक्त गणेश देशमुख सर्व विकास कामांचा सातत्याने आढवा घेत असून कामात कसूर करणाऱ्या कंत्राटदारांवरती कारवाईचा बडगा उचलत आहेत.
सद्यस्थितीमध्ये सुरू असणाऱ्या विविध प्रकल्पातील ऐंशी टक्के कामे पुर्णत्वास गेलेली असून वीस टक्के कामांमध्ये काही कंत्राटदार दिरंगाई करत असल्याने अशा कामात कुचराई करणाऱ्या कंत्राटदारांवर आयुक्तांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नजिकच्या काळात सुरू होणाऱ्या विकास कामांचा सातत्याने आढावा घेण्याचे संबधित विभागास आयुक्त गणेश देशमुख यांनी सूचित केले आहे.