सायन पनवेल महामार्गावरील सर्वांत महत्त्वाचा बस थांबा
पनवेल दि.१२ (वार्ताहर)- सायन पनवेल महामार्गावरील कळंबोली मॅकडोनाल्ड समोरील बस थांब्या जवळील स्वच्छतागृहाच्या नुतनीकरणाचे काम रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे.तर या स्वच्छता गृहांच्या साफसफाई चे काम पनवेल महापालिके मार्फत केले जाते.
मार्गावरील नेहमी हा गजबजलेला व महत्त्वाचा बस थांबा आहे. सायन पनवेल महामार्गावर याच ठिकाणाहून यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग सुरू होतो. तसेच या मार्गावरील कळंबोली सर्कल येथून कोकण गोवा, न्हावा शेवा बंदर रोड, कल्याण, मुंब्रा, नाशिक हे मार्ग जातात, तसेच समोर या परिसरातील सर्वात मोठे एमजीएम हे हाॅस्पिटल आहे. तसेच जवळच जवाहर इंडस्ट्रीज आहे. त्यामुळे या ठिकाणच्या बस थांब्यावर नेहमी वाटसरूंचा राबता असतो. या ठिकाणाहून दररोज शेकडो प्रवासी वाहणे व हजारो प्रवासी प्रवास करतात. परंतु या ठिकाणी प्रवाशांसाठी कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत. स्वच्छता गृहांची दुरावस्था झाल्याने त्याचा वापर होत नव्हता, त्यामुळे प्रवासी रस्त्याच्या कडेला लघुशंका करत होते. त्यामुळे या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच या ठिकाणी एस टी च्या तोकड्या निवारा शेड शिवाय या ठिकाणी निवार नसल्याने ऊन वारा व पावसात प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागत आहे. येवढ्या मोठ्या रहदारीच्या ठिकाणी प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली नाही. त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण करण्यासाठी एमएसआरडीसी व पनवेल महापालिकेकडे पाठपुरावा करणार असल्याचे पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांनी सांगितले आहे. या ठिकाणी रस्ते विकास महामंडळाने स्वच्छतागृह बांधले आहे. परंतु या स्वच्छता गृहांची दुरावस्था झाली आहे. परंतु रस्ते विकास महामंडळाने स्वच्छता गृहांच्या डागडुजी चे काम हाती घेतल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोट
स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली होती या ठिकाणी रहदारी जास्त असल्यामुळे स्वच्छता गृहाची दुरावस्था झाली होती. परंतु रस्ते विकास महामंडळा तर्फे डागडुजी चे काम पुर्ण होत आहे. तरी या ठिकाणी पनवेल महापालिके मार्फत या ठिकाणी स्वच्छता ठेवली जाणार आहे.
सदाशिव कवठे
प्रभाग अधिकारी कळंबोली
फोटोः स्वच्छतागृह