शिवसेना पनवेल शहर शाखेतर्फे महाड येथील पुरग्रस्तांना मदतीचा हात...

पनवेल वैभव / प्रतिनिधी :-   शिवसेना पनवेल शहर शाखेतर्फे महाड, पाचाड येथील सोंडे वाडी व निवळे वाडी येथे पुरग्रस्तांना सर्वोतोपरी मदत  करण्यात आली.

महाड, चिपळूण, खेड येथे पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे, त्यांना मदतीचा ओघ अजूनही सुरू आहे, महाड येथील सोंडे वाडी व निवळे वाडी येथे मदतीची गरज असल्याचे तेथील संबंधित व्यक्तींकडून समजले असता याची तातडीने दखल घेत पनवेल शहर शाखेतर्फे अन्न- धान्य व घरघुती सामानाचे १०० किट, त्याचबरोबर चादर, टॉवेल, चटई यांची मदत दोन्ही गावातील कुटुंबियांना करण्यात आली.

यासाठी शिवसेना शहर शाखेतर्फे शहर प्रमुख अच्युत मनोरे, उपशहरप्रमुख राहुल गोगटे, अनिल कुरघोडे यांनी विशेष मेहनत घेतली, यावेळी शिवसेना कार्यकर्ते अनिल फुलवरे , मोहसीन शेख उपस्थित होते.
Comments