कळंबोलीत १५ वर्षीय मुलाची हत्या, पोलिसांकडून अज्ञात मारेकऱ्याचा शोध सुरु..


पनवेल दि. २४ (वार्ताहर) ः कळंबोली सेक्टर-5ई भागात एका 15 वर्षीय मुलाची अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची घटना उघडकिस आली आहे. कळंबोली पोलिसांनी याप्रकरणातील अज्ञात मारेकर्‍या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.  
या घटनेतील मृत मुलाचे नाव नितेश दुबेदी (15) असे असून तो खारघर येथील कोपरा गावात कुटुंबासह रहाण्यास होता. तसेच तो कळंबोलीतील सुधागड हायस्कुलमध्ये इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत होता. लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने तो सध्या घरीच होता. नितेश दुबेदी हा पुर्वी कळंबोलीत रहाण्यास होता, त्यामुळे त्याचे सर्व मित्र हे कळंबोलीत असल्याने तो नियमित कळंबोलीत आपल्या मित्रांकडे जात होता. या मित्रांमुळेच  त्याला दारू, गांजा, भांग, सिगारेट, बिडी आदींची नशा करण्याची सवय लागली होती. त्यामुळे तो रात्री अपरात्री घराच्या बाहेर जात होता. तसेच उशीरा घरी येत होता तर कधी कधी तो घरी न येता मित्राच्या घरीच राहत होता.  नितेश रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास आपला मित्र प्रतिक याच्यासोबत स्कुटीवरुन निघून गेला होता. मात्र, त्यानंतर तो घरी परतलाच नाही. सकाळी 7 वाजता नितेशचा मृतदेह कळंबोलीतील पुजा भवानी डेअरी समोर आढळुन आला. या घटनेची माहिती मिळताच कळंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली असता, नितेशच्या डोक्यावर हल्ला करुन त्याची हत्या करण्यात आल्याचे आढळुन आले. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन खारघर मधील शेकडो महिला व पुरुषांचा सेनेत जाहीर पक्ष प्रवेश ....
Image