कामगार नेते लिलाधर भोईर मुख्य यांत्रिक इंजिनिअर अ‍ॅवॉर्ड ने सन्मानित...

पनवेल, दि.30 (वार्ताहर) ः  खांदा वसाहत परिसरात राहणारे शिवसेना पदाधिकारी व कामगार नेते लिलाधर भोईर यांना पश्‍चीम रेल्वेच्या 66 व्या रेल्वे सप्ताहात  रोलीग स्टाँक विभागात 2020- 2021 मध्ये सर्वोत्तम कार्य करणार्‍या रेल्वे कर्मचार्‍याना आज प्रमुख मुख्य याञिक इंजिनियर  हा मानाचा अँवार्ड देऊन गौरविण्यात आले. 
पश्‍चिम रेल्वेच्या महालक्ष्मी वर्कशाँप मध्ये कार्यरत असणारे लिलाधर भोईर (टेक्निशियन ग्रेड) यांच्या विषेश कामावर प्रभावित होऊन,तसेच कोरोना काळात रेल्वे कर्मचार्‍यांसाठी दिलेल्या योगदानासाठी लिलाधर भोईर याना सिल्व्हर मेडल आणी प्रशस्तीपत्र देऊन त्याना गौरविण्यात आले. 
हा सोहळा पश्‍चिम रेल्वेचे मुख्यालय चर्चगेट येथे अशेष अग्रवाल यांच्या हस्ते पार पडला. लिलाधर भोईर यांच्यावर सर्व कामगारातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे. लिलाधर भोईर हे कामगार नेते सुध्दा आहेत . नुकत्याच गुजरात(बडोदा) येथे पार पडलेल्या पश्‍चिम रेल्वे ऑल इंडिया ओ बी सी असोशिएशन च्या अधिवेशनात त्याची झोनल एक्झीक्युटिव मेम्बर, आँफीस सेक्रेटरी म्हणुन बिनविरोध निवड झाली आहे. ते महालक्ष्मी वर्कशाँप ब्रँचचे अध्यक्ष आहेत. त्यांनी हा पुरस्कार ज्याच्या मार्गदर्शनाने  ते भारतीय रेल्वेत कामाला लागले असे  देविदास गोविंद पाटिल (दादा)याच्या चरणी अर्पण करीत असल्याचे सांगितले.


फोटो ः लिलाधर भोईर यांना अ‍ॅवॉर्ड देतान अशेष अग्रवाल व इतर मान्यवर.
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image
१५ वर्षीय मुलाला कायदेशीर रखवालीतून नेेले पळवून...
Image
तुरमाळे येथील नैना विरोधातील आमरण उपोषणास भेट देत शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते यांनी दिला पाठींबा...
Image