बनावट इन्स्ट्राग्राम अकाऊंटद्वारे महाविद्यालयीन तरुणीचे मॉर्फ केलेले फोटो व्हिडीओ व्हायरल, अज्ञात व्यक्तीचा पोलिसाकडून शोध सुरु


पनवेल : कळंबोली परिसरात राहणाऱया एका 17 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा मोबाईल नंबर व फोटोचा वापर करुन तीच्या नावाने बनावट इन्स्ट्राग्राम अकाऊंट तयार करुन त्यावर मॉर्फ केलेले तरुणीचे अश्लिल फोटो, व्हिडीओ तसेच अश्लिल मेसेज टाकुन सदर तरुणीची बदनामी केल्याचा प्रकार उघडकिस आला आहे. कळंबोली पोलिसांनी या प्ररकरणातील अज्ञात व्यक्ती विरोधात आयटी ऍक्टसह बदनामीकारक माहिती प्रसिद्ध केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.   
या घटनेतील 17 वर्षीय महाविद्यालयीन तरुणी कळंबोलीत रहाण्यास असून सध्या ती शिक्षण घेत आहे. या तरुणीने वर्षभरापुर्वी आपल्या नावाने इन्स्ट्राग्रामचे अकाऊंट सुरु केले होते. गत मार्च महिन्यामध्ये या तरुणीला एका अज्ञात व्यक्तीने रिक्वेस्ट पाठवली होती. त्यावर सदर तरुणीने क्लिक केल्यानंतर त्यात सदर तरुणीच्या नावाने बनावट इन्स्ट्राग्राम अकाऊंट तयार करण्यात आल्याचे तसेच सदर अकाऊंटवर तरुणीचा मोबाईल क्रमांकाचा वापर करण्यात आल्याचे आढळुन आले. त्याचप्रमाणे सदर तरुणीच्या फक्त चेहऱ्याचा वापर करुन मॉर्फ केलेले तरुणीचे अश्लिल फोटो व व्हिडीओ टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. 

सदर फोटो व व्हिडिओ सोबत अश्लील मजकुर टाकण्यात आल्याचे तरुणीच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे मॉर्फ केलेले फोटो, व्हिडीओ व मेसेज सदर तरुणीच्या खऱ्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटमधील 106 मित्र मैत्रिणींना पाठवण्यात आल्याचे देखील या तरुणीच्या लक्षात आले. बदनामी करण्याच्या उद्देशानेच अज्ञात व्यक्तीने हा प्रकार केल्याचे तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तरुणीने सदर प्रकाराची माहिती आपल्या आई-वडिलांना दिली. त्यानंतर तरुणीच्या वडिलांना याबाबतची लेखी तक्रार कळंबोली पोलिसांकडे केली होती. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणाचा प्राथमिक तपास करुन अज्ञात व्यक्ती विरोधात आयटी ऍक्टसह बदनामीकारक माहिती प्रसिद्ध केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
Comments